अकोला जिल्ह्यात स्त्रियांच्या पदरा आडून पुरूषी सत्तेचे डाव

अनिल दंदी
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली असून यामध्ये तालुक्यातील सर्वाधिक जागा महीलांच्या वाट्याला जाणार आहेत, हे निश्चित असले तरी घरातल्या स्त्रियांच्या पदरा आडून पुरुषी सत्तेचे डाव तालुक्यातील नेते मंडळी कडून रचले जात आहेत.

बाळापूर (अकोला) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली असून यामध्ये तालुक्यातील सर्वाधिक जागा महीलांच्या वाट्याला जाणार आहेत, हे निश्चित असले तरी घरातल्या स्त्रियांच्या पदरा आडून पुरुषी सत्तेचे डाव तालुक्यातील नेते मंडळी कडून रचले जात आहेत.

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात जागांपैकी 4 व पंचायत समितीच्या 14 पैकी 7 जागा महीलांसाठी राखीव आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेचे व्याळा, हातरुण, पारस गट व पंचायत समितीचे व्याळा, हातरुण व गायगाव, पारस गण अनुसूचित जाती साठी राखीव असल्याने या गण व गटातील दिग्गज नेत्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे. मात्र जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष मानल्या गेलेल्या भारिप बमसंच्या पदाधीकाऱ्यांनी या निवडणुकीसाठी व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे. तर भाजपा कडून अनुसूचित जातीच्या उमेदवारांची सर्च मोहीम हाती घेतली जाणार आहे. 

निमकर्दा गट व निंबा, देगांव, बटवाडी, निमकर्दा व वाडेगाव (1) हे गण सर्वसाधारण व ना.मा.प्र. महीलांसाठी राखीव आहेत. गावखेड्यातल्या स्थानिक राजकारणात महिलांचा सहभाग असला तरी गावात फारशा कधी कुणाला ज्या नजरेसही पडत नव्हत्या, अशा अनेक बड्या घरच्या सुना आता निवडणुका लढवून माजघरातून थेट जिल्हा परिषदांमध्ये आणि पंचायत समित्यांमध्ये डोकावणार आहेत. 

अंदुरा, लोहारा, मोरगाव (सादिजन) हे गण व वाडेगाव गट सर्वसाधारण साठी राखीव आहेत. त्यामुळे ईथे मातब्बरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Web Title: ZP and panchayt samiti Election news in Akola district