टॅब परत करा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

नागपूर  : जिल्हा परिषदेतर्फे देण्यात आलेल्या वस्तू सदस्यांना परत कराव्या लागणार आहेत. सदस्यांना दिलेले टॅबही परत करण्याचे आदेश प्रशासनाने सदस्यांना दिले.

नागपूर  : जिल्हा परिषदेतर्फे देण्यात आलेल्या वस्तू सदस्यांना परत कराव्या लागणार आहेत. सदस्यांना दिलेले टॅबही परत करण्याचे आदेश प्रशासनाने सदस्यांना दिले.
डिजिटल इंडियाची कास धरत सरकारने अनेक उपक्रम ऑनलाइन केले. ग्रामस्थांपर्यंत प्रत्येक योजना आणि उपक्रमाची माहिती पोहोचविण्यासाठी सदस्यांना टेक्‍नोसॅव्ही करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला होता. यासाठी जि.प.च्या माजी अध्यक्ष निशा सावरकर यांनी ग्रामविकास मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. ग्रामविकास व जलसंधारण विभागाने 31 मार्च 2016 रोजी जि. प. ला पत्र पाठवून टॅबलेटला मंजुरी दिली होती. जि. प. ने स्वत:च्या सेसफंडातून 58 सदस्यांसाठी 21 लाखांवर तरतूद केली. हे टॅबलेट निवडणुका लागल्यानंतर जि. प. प्रशासनाकडे परत करावे लागणार, अशी अट देताना घातली होती. 18 जुलै रोजी जिल्हा परिषद बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांना प्रशासनाने कुलूप लावले. त्यांचे बंगले, वाहने ताब्यात घेतली. आता टॅब परत करण्यासाठी प्रत्येक सदस्याला पत्र पाठविण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाने टॅब परत करण्यासाठी पत्र पाठविले आहे. काही सदस्यांना पत्र मिळाले तर काही सदस्यांना पं. स. मधून फोनसुद्धा गेले आहेत. विशेष म्हणेज टॅब घेतला नसतानाही पत्र पाठविण्यात आले आहे. काही सदस्यांनी टॅब परत करण्यासाठी प्रशासनाला स्वत:हून विचारणा केल्याचे समजते. पण, ज्यांचे टॅब खराब झाले, हरवले असतील त्यांची पंचाईत होणार आहे. विशेष म्हणजे टॅब परत न केल्यास, गहाळ झाल्यास भरपाई करून न दिल्यास निवडणूक लढता येणार नसल्याचे सांगण्यात येते.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: zp news nagpur