आठ हजारांत ‘डिजिटल शाळा’!

Digital-School
Digital-School

नागपूर - रामटेक तालुक्‍यातील हिवरा-हिवरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे प्रयोगशील शिक्षक सचिन चव्हाण अभिनव व नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी सर्वपरिचित आहेत. यापूर्वीही त्यांचा पुढाकार आणि लोकसहभागातून पहिली डिजिटल शाळा केवळ तेवीस हजारांत साकारली. त्यांनी दुसऱ्यांदा लोकसहभागातून हिवरा हिवरी शाळेचे डिजिटलायजेशन केले असून त्यांसाठी खर्च आला अवघा आठ हजार. या गौरवास्पद कामगिरी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कृत प्रयोगशील शिक्षक सचिन चव्हाण यांनी सर्वप्रथम ग्रामपंचायत हिवरा हिवरीकडून चौदाव्या वित्त आयोगमधून शाळेसाठी एक प्रोजेक्‍टर, एक लॅपटॉप प्राप्त करून घेतले. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीच्या मासिक सभेत नव्याने डिजिटलायजेशनचा विषय मांडला. स्वतःसह अन्य शिक्षक आणि पालकांनी मिळू आठ हजार तीनशे रुपये लोकसहभागातून जमविले. डिजिटल शाळा बनविण्याचा अनुभव पाठीशी असल्याने दुसऱ्यांदा त्यांना फारशा अडचणी आल्या नाहीत. तातडीने सोलापूर येथून ई-लर्निंग अभ्यासक्रमाच्या सीडी इयत्ता पहिली ते आठवीसाठी मराठी व सेमी इंग्रजी दोन्ही माध्यमांतील अभ्यासक्रम लॅपटॉपमध्ये टाकून घेतले आणि अवघ्या आठ हजारांत शाळा डिजिटल झाली. 

मागील महिन्यातच त्यांच्या प्रयत्नांमुळे शाळेला ‘युनेस्को स्कूल ऑफ क्‍लब’ची मान्यता मिळाली. कर्तृत्ववान शिक्षकांच्या कार्याला ग्रामस्थांनी साथ दिल्याने विद्यार्थ्यांची आधुनिक शिक्षणाची सोय गावातच झाली, हे विशेष. डिजिटल शाळा विद्यार्थ्यांसाठी नुकतीच खुली झाली. यावेळी मुख्याध्यापिका राजश्री गायधने, संध्या राऊत, कोमल मलेवार, शालिक महाजन, संगीता सोनटक्के, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदू चव्हाण उपस्थित होते. सरपंच सुरेखा मलेवार, उपसरपंच विष्णू काठोके, माजी सरपंच दिलीप काठोके, विघ्नेश्वर मलेवार, माधव मलेवार, नंदा नेवारे, तुकाराम पवार आदींनी या उपक्रमाचे कौतुक करीत अभिनंदनही केले.

डिजिटल शाळेसाठी आलेला वर्गनिहाय खर्च
वर्ग              रक्कम 

पहिली           १,५००
दुसरी             ६००
तिसरी             ७००
चौथी             ७००
पाचवी            ९००
सहावी            ९००
सातवी            ९००
आठवी           २,०००
पोस्टेज खर्च       १००
एकूण             ८,३००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com