पूर्णेकर कुटुंबाला आवाहन, 'न्यायासाठी मागे हटू नका!

Purnekar Case: पूर्णेकर हत्याकांडात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा पोलिसांच्या तपासावर संशय; मुख्यमंत्र्यांवर राजकीय निशाणा साधत ठाणे पालकमंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी!

Thane Crime: ठाण्यातील शिवसेना (उबाठा) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर (Pradeep Purnekar) यांच्या हत्या प्रकरणात कायदेतज्ज्ञ अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेत गंभीर आरोप केले आहेत. पूर्णेकर हत्या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतल्यानंतर सदावर्ते यांनी या प्रकरणातील पोलीस तपास, मूळ एफआयआर (FIR), पुरवणी जबाब आणि राजकीय दबावावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ठाण्यात घडलेल्या या राजकीय हत्येबाबत मुख्य राजकीय जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्ट खुलासा करावा, तसेच नैतिकतेच्या मुद्द्यावर आपल्या ठाण्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी सदावर्ते यांनी केली आहे. यासोबतच, त्यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन कोणत्याही दबावाला न बळी पडता न्यायासाठी शेवटपर्यंत लढण्याचे आणि मागे न हटण्याचे ठाम आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com