Ladki Bahin Yojana: अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख! लाडकी बहिण योजनेचे पैसे वाढवणार? अजित पवारांची पोस्ट व्हायरल

Ajit Pawar On Ladki Bahin Yojana Fund: लाडकी बहिण योजनेवर विरोधी पक्षातील नेते सतत प्रश्न उपस्थित करत आहेत. याचबरोबर या योजनेसाठी सरकार कुठून पैसे आणणार याबाबतही विचारणा करत आहेत.

राज्य सरकारची महत्वाकांक्षी माझी लाडकी बहिण योजना विरोधकांच्या रडारवर आली आहे. यावरून अजित पवारांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं. अजित पवार यांनी ट्विट करत लाडकी बहिण योजनेवरून विरोधकांवर निशाणा साधला. तसेच लाडक्या बहिणीला वाढीव निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही अजित पवार यावेळी म्हणाले.

आपल्या ट्विटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "'माझी लाडकी बहीण योजना' टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत. परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे, तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे कारण, ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचे भाकित आहे. परंतु येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देवून या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन. ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये आहे."

Ajit Pawar On Ladki Bahin Yojana Fund
Hindus In Bangladesh: बांगलादेशात मंदिरे, हिंदू महिला अन् नेते टार्गेट; आक्रोश करणाऱ्या महिलांचा व्हिडिओ व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com