Alibag news | महिलेचा धुडगूस, बेदरकारपणे कार चालवून अनेक वाहनांना उडवलं

अलिबाग |महिलेने दारू पिऊन वाहनांना उडवलं, गुन्‍हा दाखल

पुण्‍याहून आलेल्‍या पर्यटकांनी अलिबागमध्‍ये भररस्‍त्‍यात धुडगुस घातल्याची घटना समोर आली आहे. अलिबाग शहरात पर्यटक महिलेने मद्यधुंद अवस्‍थेत बेदरकारपणे कार चालवून वाहनांना धडक दिली. त्‍यांनी पोलीस व स्थानिकांसोबत वाद घातला याप्रकरणी एका महिलेविरोधात अलिबाग पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. मीना भोसले असं या महिलेचे नाव आहे. या महिलेने बेदरकार कार चालवत जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर असलेल्या रुग्णवाहिकांसह शहरातील काही वाहनांना धडक दिली. या महिलेने अलिबाग समुद्र किनाऱ्या पासून रेवदंडा बायपास पर्यंत बेदरकारपणे कार चालवली. यामध्ये वाहनांचे नुकसान झाले असून कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. पोलीसांनी गाडीची तपासणी केली असता कारमध्ये काही दारुच्या बाटल्या आढळून आल्या. महिलेसह तिच्‍या सोबत असलेल्‍या पुरूषाची वैद्यकीय चाचणी करण्‍यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com