पुण्यात आयोजित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून विविध मुद्द्यांवर भाष्य केले. अजित डोवाल यांच्या देशाच्या सुरक्षेतील योगदानाचा गौरव करत त्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. अमित शाह यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातूनही महत्त्व प्राप्त झाले. या कार्यक्रमातील एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे आणि सोहळ्याचे खास क्षण पाहा या व्हिडीओमध्ये....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.