नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले यांना यंदाच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मानाचा प्रतिनिधी म्हणून सन्मान मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पहाटे अडीच वाजता पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ही महापूजा पार पडली. कैलास उगले हे पेशाने शेतकरी असून, मागील १२ वर्षांपासून ते अखंडपणे पंढरीची वारी करत आहेत. त्यांच्या या समर्पित वारकरी सेवेची दखल घेत यंदा त्यांना आणि त्यांच्या पत्नी कल्पना उगले यांना मानाचा वारकरी म्हणून शासकीय महापूजा करण्याचा गौरव प्राप्त झाला. पंढरीच्या विठोबाच्या चरणी उगले दांपत्याने भक्तिभावाने ही पूजा अर्पण केली असून, त्यांच्या या सहभागामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.