Devendra Fadnavis आणि Amruta Fadnavis यांनी केली पूजा । Pandharpur news

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात भक्तीचा महासागर; पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न, नाशिकच्या कैलास उगले यांना वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजेचा मान, २२ लाखांहून अधिक भाविकांची पंढरीत उत्स्फूर्त गर्दी, चंद्रभागा स्नान, टाळ-मृदुंगाच्या गजरात विठू नामाचा जयघोष..

आज आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी पंढरपूरमध्ये भक्तीचा महासागर उसळला आहे. पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजेचा विधी पार पडला. या पूजेसाठी नाशिक येथील वारकरी कैलास उगले यांना वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजा करण्याचा मान मिळाला. पंढरी नगरी आज टाळ-मृदुंगाच्या गजराने निनादत आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी देशभरातून आलेले लाखो भाविक पंढरपूरमध्ये जमले आहेत. सुमारे २० ते २२ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी पंढरीत हजेरी लावली आहे. चंद्रभागा नदीच्या घाटांवर पहाटेपासूनच स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. मठ, मंदिरं आणि रस्त्यांवर विठू नामाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले आहे. या सोहळ्यामुळे संपूर्ण पंढरपूर भक्तिरसात न्हालं असून, विठोबाच्या दर्शनासाठी आतुरतेने उभ्या असलेल्या रांगा वारकरी परंपरेच्या श्रद्धा आणि भक्तीचा उत्कट प्रत्यय देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com