Aashta Nagarparishad Live Update: Jayant Patilनी गड राखला, Ajit Pawar ना धक्का | Sakal News

Aashta Nagarparishad News: सांगली जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या आष्टा नगरपरिषद निवडणुकीत शिंदे–पाटील नेतृत्वाचा दबदबा कायम; नगराध्यक्षपदासह २४ पैकी २३ जागांवर आष्टा शहर विकास आघाडीचा दणदणीत विजय, विशाल शिंदेंकडून अजित पवार गटाला मोठा धक्का..

सांगली जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या आष्टा नगरपरिषद निवडणुकीत मोठा राजकीय संदेश देणारा निकाल समोर आला आहे. आमदार जयंत पाटील आणि दिवंगत आमदार विलासराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आष्टा शहर विकास आघाडीने सत्ता अबाधित ठेवत जबरदस्त विजय मिळवला आहे. नगराध्यक्षपदासह एकूण २४ पैकी तब्बल २३ जागांवर आघाडीने एकतर्फी बाजी मारली आहे. नगराध्यक्ष पदाच्या लढतीत दिवंगत विलासराव शिंदे यांचे चिरंजीव विशाल शिंदे यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांचे निकटवर्तीय प्रवीण माने यांचा पराभव केला आहे. त्यामुळे आष्ट्यातील सत्तासंघर्षात शिंदे-पाटील नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास टाकल्याचं स्पष्ट झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Satej Patil Jayant Patil Maharashtra Political News
Sadabhau Khot latest political statement
Jayant Patil Sangli political developments
Why is Ashta Bhavai Festival celebrated?
Marathi News Esakal
www.esakal.com