Anna Bansode यांच्या मुलाविरोधात महिलांचा संताप, Ajit Pawar यांना भेटण्याची मागणी | NCP | Baramati | Sakal News

Baramati News: 'आम्हाला आमदाराचा पुत्र नको' बारामतीतील हॉस्टेल परिसरात प्रभाग क्रमांक ९ मधील महिलांचा संताप; अण्णा बनसोडेंच्या मुलाविरोधात रोष व्यक्त, ‘अजितदादा आम्हाला भेटतही नाहीत’ असा आरोप..

बारामतीत राजकीय वातावरण तापल्याचं चित्र दिसत आहे. आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाविरोधात महिलांनी उघडपणे संताप व्यक्त केला असून, 'आम्हाला आमदाराचा पुत्र नको,' अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. बारामतीतील एका हॉस्टेल परिसरात प्रभाग क्रमांक ९ मधील महिलांनी एकत्र येत आपला रोष व्यक्त केला. महिलांचा आरोप आहे की, स्थानिक प्रश्न, मूलभूत सुविधा आणि तक्रारींकडे अण्णा बनसोडे व त्यांच्या कुटुंबाकडून दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे आमदाराचा पुत्र परिसरात हस्तक्षेप करत असल्यास तो मान्य नसल्याचं महिलांनी स्पष्ट केलं. यावेळी महिलांनी अण्णा बनसोडे यांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली. 'आम्हाला अण्णा बनसोडेंचा पुत्र तिथे नको,' अशी मागणी करत, लोकप्रतिनिधींनी थेट जनतेशी संवाद साधावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच 'अजितदादा आम्हाला भेटतही नाहीत,' असा आरोप करत वरिष्ठ नेत्यांकडूनही दखल घेतली जात नसल्याची खंत महिलांनी बोलून दाखवली. या घटनेमुळे बारामतीच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली असून, महिलांच्या या संतापावर आमदार अण्णा बनसोडे आणि संबंधित नेते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Following Ajit Pawar’s Legacy: Jai Pawar Starts Janta Darbar in Baramati
Sunetra Pawar Emotional Post Ajit Pawar
Baramati Bypoll Sunetra Pawar ajit pawar
Sunetra Pawar Banner in Pandharpur
Marathi News Esakal
www.esakal.com