SUGARCANE PRICE ROW | ऊसदराचा प्रश्न अद्याप सुटलेला नसतानाही साखर कारखाने सुरू ठेवल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथील वृंदावन साखर कारखाना बंद पाडला. कार्यकर्त्यांनी थेट उसाच्या गव्हाणीत उड्या मारत कारखान्याचे कामकाज रोखले. यावेळी त्यांनी ट्रॅक्टरची हवाही सोडून दिली. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ऊसदरावर तोडगा निघेपर्यंत साखर कारखाने बंद ठेवण्याचे ठरले होते. मात्र, ऊसदराचा प्रश्न अद्याप प्रलंबित असतानाही वृंदावन साखर कारखाना सुरू असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत कारखाना बंद पाडला. या घटनेमुळे बार्शी तालुक्यातील ऊसदराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.