'जोपर्यंत माझे पैसे निघणार नाहीत, तोपर्यंत पाणी सोडणार नाही. गावाला काय प्यायला द्यायचे तर द्या..' असे म्हणत ग्रामसभेत सरपंच पतीने गावकऱ्यांना थेट धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील अंतरवन पिंपरी तांडा गावात उघडकीस आला आहे. या घटनेमुळे सरपंच पतीची मुजोरी चव्हाट्यावर आली आहे. २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला असता हा वाद झाला. यावेळी सरपंच पतीने संताप व्यक्त करत पाणीपुरवठा बंद ठेवण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गावात १.१४ लाख रुपयांची जुनी पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली असतानाही गेल्या पाच महिन्यांपासून नव्या योजनेतून गावाला पाणी मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या गंभीर प्रकरणामुळे ग्रामपंचायत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.