मुंबई उच्च न्यायालयाने एकल पालक (Single Parent) असलेल्या आई आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या हक्कासंदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की, केवळ वडिलांचं जात प्रमाणपत्र उपलब्ध नाही म्हणून RTE (Right to Education) अंतर्गत प्रवेश नाकारणं योग्य ठरणार नाही. या प्रकरणात आईचं वैध जात प्रमाणपत्र आणि उपलब्ध इतर पुरावे विचारात घेऊन विद्यार्थ्याला शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले. या निर्णयामुळे एकल पालक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून RTE प्रवेश प्रक्रियेसाठीही हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.