व्हिडिओ | Videos
Buldhana News: अतिक्रमण काढायला गेलेल्या अधिकाऱ्यांना मारहाण | Sakal News
Buldhana News: बुलढाण्यात मोठा संघर्ष, माळेगावमध्ये अतिक्रमण हटवायला गेलेल्या पोलिस व वन कर्मचाऱ्यांवर आदिवासी बांधवांची तुफान दगडफेक; मिरची पूड फेकून कोयत्याने हल्ला, परिसरात तणावाचे वातावरण..
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातल्या माळेगाव येथे सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 10 ते 15 वर्षांपासून शेकडो एकर सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून राहत असलेल्या आदिवासी बांधवांविरुद्ध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. मात्र, अतिक्रमण हटवण्यासाठी पोहोचलेल्या पोलीस आणि वन विभागाच्या पथकाला तीव्र विरोधाचा सामना करावा लागला.