सांगलीचे माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना भाजपचे ज्येष्ठ नेते व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट पूर्णविराम दिला आहे. “संजयकाका पाटील सध्या अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन देखील तिथेच व्हावे. ते आमचे जुने नेते आणि मित्र आहेत, म्हणूनच त्यांच्या पुनर्वसनासाठी आम्ही अजित पवारांना मदत करणार आहोत,” असे स्पष्ट मत पाटील यांनी मांडले. दरम्यान, सांगलीचे विद्यमान अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “विशाल पाटील यांना भाजपसोबत येण्याची ऑफर आम्ही देतच राहू.” या वक्तव्यामुळे सांगलीतील राजकीय समीकरणांवर पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.