Delimitation म्हणजे काय? काँग्रेसचा विरोध, भाजपचा प्रस्ताव अन् दक्षिण भारताची चिंता

काँग्रेसचा विरोध आहे, पृथ्वीराज चव्हाण यांनी दक्षिणेकडील राज्यांच्या प्रतिनिधित्वाबाबत चिंता व्यक्त केलीय, तर सुप्रिया सुळे यांनी काही अटींसह या प्रस्तावाला तत्त्वतः पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे.

आज लोकसभेत 543 खासदार आहेत. पण केंद्र सरकारचा प्रस्ताव मान्य झाला, तर राज्यांमधून निवडून येणाऱ्या खासदारांची संख्या 815 पर्यंत जाऊ शकते! म्हणजे लोकसभेचं राजकीय गणितच बदलू शकतं. पण इथेच खरा प्रश्न सुरू होतो… जागा वाढणार, हे ठीक; पण त्या जागा कोणत्या राज्याला किती मिळणार? उत्तर भारतातील राज्यांचं प्रतिनिधित्व वाढणार की दक्षिण भारताचं राजकीय वजन कमी होणार? आणि महिला आरक्षण लागू करण्यासाठी डिलिमिटेशनची अट का जोडली जातेय? केंद्रीय मंत्रिमंडळानं डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिल्याचं वृत्त आहे. मात्र, या प्रस्तावावरून राजकीय संघर्ष सुरू झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...