Dhule News: फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना लायब्ररीत डांबून ठेवलं, इंग्लिश मीडियम शाळेतला प्रकार | Sakal News

Dhule News: धुळेच्या चावरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुलांना फीच्या कारणावरून डांबून ठेवण्याचा प्रकार; भाजप शहराध्यक्ष गजेंद्र अंबळकर यांनी घेतली शाळेत धाव..

धुळे शहरातील वलवाडी शिवारातील चावरा इंग्लिश मीडियम स्कूलमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. शाळा प्रशासनाने काही विद्यार्थ्यांना केवळ फी भरलेली नसल्यामुळे वर्गातच डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब संबंधित पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंबळकर यांच्याशी संपर्क साधला. अंबळकर यांनी शाळेत धाव घेत शाळा प्रशासनाला जाब विचारला आणि विद्यार्थ्यांना का अडवण्यात आले याबाबत सविस्तर माहिती मागितली. या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, शिक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रात अशा प्रकारे वागणूक दिली जाणं निंदनीय असल्याचे मत व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com