राज्यातला सर्वात मोठा सहकारी दूध संघ असलेला गोकुळ कोल्हापुरात मोठं राजकीय सत्ताकेंद्र मानलं जातं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंटी पाटील सध्या चक्रव्यूहात अडकले आहेत. त्यांच्यावर केवळ बाहेरील शत्रूच नाही, तर आपल्याच माणसांकडून झालेला विश्वासघात मोठा धक्का ठरत आहे. अशा कठीण परिस्थितीत, एकमेव साथ देणारा नेता म्हणजे हसन मुश्रीफ, जो सावलीसारखा पाठीशी उभा आहे. या साऱ्या घडामोडी दरम्यान, आता गोकुळच्या राजकारणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही सक्रिय भूमिका दिसून येत आहे. त्यांच्या हस्तक्षेपामुळे सत्तासमीकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. या साऱ्या राजकीय वातावरणात सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या बंटी पाटील यांच्यावर ते हे चक्रव्यूह कसे भेदणार, कोणती नवीन रणनीती आखणार आणि पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करणार का?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.