Gokul Dudh Sangh News : गोकुळनंतर वारणाचंही दूध महागलं; दूधदरवाढीमागची नेमकी 5 कारणं काय?

गोकुळ आणि वारणा दूध संघांनी दूध विक्री दरात वाढ केली आहे. पशुखाद्य, चारा, जनावरांचे संगोपन, दूध प्रक्रिया आणि वाहतूक खर्चातील वाढीचा दूधदरावर परिणाम झाला आहे

गोकुळनंतर आता वारणा दूध संघानेही दुधाच्या विक्री दरात वाढ केली आहे. म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर ६ रुपये, तर गायीच्या दुधाच्या दरात ४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ २१ नोव्हेंबर २०२६ पासून लागू झाली आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना दूध खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र, दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही वाढीव खरेदी दर देण्यात आला आहे. म्हशीच्या दुधासाठी प्रतिलिटर ३ रुपये, तर गायीच्या दुधासाठी २ रुपये वाढ करण्यात आली आहे. दूध उत्पादनासाठी लागणारे पशुखाद्य, चारा, जनावरांचे संगोपन आणि पशुवैद्यकीय सेवांचा वाढता खर्च ही दरवाढीमागची महत्त्वाची कारणं आहेत. याशिवाय दूध संकलन, शीतकरण, प्रक्रिया, पॅकिंग, वाहतूक आणि इंधन खर्चाचाही दूध व्यवसायावर परिणाम होत आहे. गोकुळ आणि वारणाच्या दूधदरवाढीचं नेमकं गणित काय? दूध उत्पादकांना किती फायदा होणार? दरवाढीमुळे ग्राहकांच्या मासिक बजेटवर किती अतिरिक्त भार पडणार? जाणून घ्या या विशेष Explainer मध्ये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...