Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Chief Election Commissioner Gyanesh Kumar: निवडणूक आयोगातील घडामोडींमध्ये ज्ञानेश कुमार यांच्यावर वाढत असलेला दबाव; राजीनाम्याच्या चर्चेला वेग

Election Commission Resignation: भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार सध्या मोठ्या राजकीय आणि प्रशासकीय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मतदार याद्यांच्या 'विशेष सखोल उजळणी' म्हणजेच SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेत अनियमितता, फॉर्म-६ मधील कथित अवैध बदल आणि डेटाचे केंद्रीयीकरण केल्याचा आरोप त्यांच्यावर विरोधकांकडून केला जात आहे. तसेच, निवडणूक आयोगातीलच दोन आयुक्त – डॉ. सुखबीर सिंह संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत या प्रक्रियेवर तब्बल १४ वेळा औपचारिक आक्षेप नोंदवल्याचा अहवाल समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com