Ganeshotsav 2026: यंदा हरतालिका आणि श्रीगणेश चतुर्थी एकाच दिवशी येणार आहेत. सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजून ६ मिनिटांनी भाद्रपद शुक्ल तृतीया संपून चतुर्थी सुरू होणार आहे. सूर्योदयाच्या वेळी तृतीया असल्याने हरतालिका पूजन १४ सप्टेंबरलाच करायचे असून, मध्यान्हकाली चतुर्थी असल्याने गणेशमूर्ती स्थापना आणि पूजनही त्याच दिवशी होणार आहे. पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांच्या माहितीनुसार, हरतालिका पूजन सूर्योदयापासून मध्यान्हकाळापर्यंत करता येईल. गणेशमूर्ती स्थापना आणि षोडशोपचार पूजनासाठी सकाळी ११.२१ ते दुपारी १.४८ हा मध्यान्हकाळ सांगण्यात आला आहे. ही वेळ शक्य नसल्यास सूर्योदयापासून मध्यान्हकाळ संपेपर्यंत पूजन करता येईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.