Hingoli News: हातात तलवार घेऊन तरुणाने माजवली दहशत, धमकी दिली, पोलिसांनी खाकी दाखवताच.. | Sakal News

Hingoli News: हिंगोलीच्या वसमत तालुक्यातहातात तलवार घेऊन तरुणाने दहशत माजवल्याचा प्रकार घडला. मोहन दत्तात्रय नवले असं या तरुणाचं नाव. काही पोरांना धमकावताना देखील तो या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हिंगोलीच्या वसमत तालुक्यात हातात तलवार घेऊन एक तरुण दहशत माजवित असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मोहन दत्तात्रय नवले असे या तरुणाचे नाव असून तो बळेगावचा रहिवासी आहे. व्हिडीओमध्ये तो काही पोरांना धमकावताना स्पष्ट दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा तरुण प्रथम दुचाकीवर तलवार घेऊन गावात दाखल झाला आणि आसपासच्या युवकांना धाक दाखवत दहशत निर्माण केली. तलवार फिरवत धमकी दिल्यानंतर हा प्रकार अधिक गंभीर व चिंताजनक बनला. दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई केली व तरुणाला ताब्यात घेत खाकीची ताकद दाखवली. पोलिसांसमोर तरुणाने बिनशर्त माफी मागितल्याचेही समजते. मात्र या संपूर्ण प्रकारावर समाधानी न रहाता पोलिसांनी मोहन नवले याच्याविरोधात आर्म्स ऍक्टसह संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com