Diabetes टाळायचा असेल तर Lifestyle बदलणं गरजेचं?

Health with Sakal: योग्य आहार, नियमित व्यायाम अन् वजन नियंत्रण! डायबेटॉलॉजिस्ट डॉ. उदय फडके यांच्याकडून जाणून घ्या डायबिटीस टाळण्याचे सोपे अन् प्रभावी उपाय.

Health with Sakal: आजच्या बदलत्या जीवनशैलीत आणि वाढत्या ताणतणावात डायबिटीस (मधुमेह) हा आजार वेगाने पसरताना दिसत आहे. मात्र, योग्य खबरदारी आणि जीवनशैलीत वेळेवर केलेले बदल यांद्वारे ट टाईप-२ डायबिटीस टाळणे किंवा त्याचा धोका दूर ढकलणे पूर्णपणे शक्य आहे, असे मत प्रसिद्ध डायबेटॉलॉजिस्ट डॉ. उदय फडके यांनी मांडले आहे. 'हेल्थ विथ सकाळ' (Health with Sakal) या विशेष उपक्रमात त्यांनी निरोगी जीवनशैलीचे महत्त्व स्पष्ट केले. योग्य आहार, दैनंदिन व्यायाम, वजनावर नियंत्रण आणि पुरेशी झोप या घटकांचा मधुमेहाच्या धोक्यावर कसा थेट परिणाम होतो, याचे सविस्तर विश्लेषण डॉ. फडके यांनी केले आहे. जर तुमच्या कुटुंबात मधुमेहाची पार्श्वभूमी असेल किंवा तुमचे वजन जास्त असेल, तर प्राथमिक टप्प्यातच रक्तातील साखरेचे नियंत्रण कसे ठेवावे आणि मधुमेहापासून स्वतःचे रक्षण कसे करावे, याविषयीचा हा मार्गदर्शक सल्ला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com