पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्येचं प्रकरण उघडकीस आणणारे पत्रकार रंजीत माजगावकर यांची ही विशेष मुलाखत अनेक धक्कादायक बाबी उजेडात आणते. या मुलाखतीत माजगावकर यांनी अभय कुरुंदकर यांच्यासह या प्रकरणाशी संबंधित अनेक पैलू स्पष्टपणे मांडले आहेत. महाराष्ट्र पोलीस दलासह संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलेली ही घटना इतकी भयावह आहे की ती एखाद्या थरारपटालाही लाजवेल. प्रकरणाच्या तपासात आणि न्यायप्रक्रियेत व्यवस्थेने घेतलेली बोटचेपी भूमिका आणि त्यामुळे बिद्रे यांच्या कुटुंबाला भोगावा लागलेला मनस्ताप हा अतिशय सुन्न करणारा आणि विचार करायला लावणारा आहे. रंजीत माजगावकर यांच्या तपशीलवार आणि निष्पक्ष चौकशीतून या प्रकरणातील अनेक दुर्लक्षित पैलूंना वाचा फुटली असून, ही मुलाखत केवळ एका गुन्ह्याची कहाणी नसून, संपूर्ण व्यवस्थेच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उभं करणारी ठरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.