Jain Boarding land Controversy: Amit Shah यांचा दौरा अन् जैन हॉस्टेल प्रकरणात ट्विस्ट | Pune News | Sakal News
पुण्यातील जैन बोर्डिंग होस्टेल जमीन व्यवहार प्रकरणात नवं वळण आलं आहे. या प्रकरणाशी संबंधित गोखले बिल्डर्स यांनी ट्रस्टींना मेल पाठवत, 'आम्ही हा व्यवहार रद्द करत आहोत, कृपया आमचे पैसे परत द्या,' अशी स्पष्ट मागणी केली आहे. दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजकीय स्तरावरही हालचाली वेगाने सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर असताना, काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतलेल्या काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांना 'पुढील दोन दिवस काही बोलू नका,' असा सल्ला दिल्याचे धंगेकर यांनी स्वतः सांगितले आहे. एकाच दिवशी घडलेल्या या दोन मोठ्या घटनांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून, हा केवळ योगायोग आहे की यामागे कुठलं तरी नवं राजकीय गणित दडलं आहे, असा प्रश्न आता अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
