जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीतील राजकीय संघर्ष समोर आला आहे. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्यात एका जागेवरून मतभेद निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे १२ उमेदवार बिनविरोध निवडून आले असताना याच सत्ताधारी आघाडीतील दोन आमदार आमनेसामने आल्याने जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या वादाला स्वाभिमान, स्थानिक राजकीय समीकरणे आणि नेतृत्वाच्या प्रभावाची किनार असल्याचे चित्र आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या संघर्षाचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंगेश चव्हाण आणि किशोर पाटील यांच्यातील वाद नेमका कशामुळे सुरू झाला? जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून महायुतीसमोर कोणते प्रश्न उभे राहिले आहेत? जळगावमधील स्थानिक राजकारण आणि महायुतीच्या समन्वयाचा सविस्तर आढावा या व्हिडिओत पाहा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.