Bihar News: जमुई प्रकरण: महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न की राजकीय ध्रुवीकरण?

Jamui Assault Case: जमुईतील घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह; कायदा-सुव्यवस्थेतील त्रुटी की राजकीय अजेंड्याचा भाग, यावरून वाद पेटला

Bihar Viral Video: बिहारमधील जमुई जिल्ह्यात एका अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत घडलेल्या छेडछाडीच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. या घटनेनंतर महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून समाजातील विकृत मानसिकतेवर तीव्र टीका होत आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्याला राजकीय आणि जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू झाल्यामुळे परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे. यातच तत्काळ न्यायाची मागणी करत काही घटकांकडून 'एन्काउंटर'ची मागणी केली जात असताना, दुसरीकडे कायदेशीर आणि न्यायालयीन प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेचा अभाव आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक उरला नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com