Jantar Mantar Protest: 'पोलिसांनी बेदम मारलं, नेमप्लेटही नव्हती'; नागपूरच्या शुभमचा धक्कादायक दावा..

दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलनादरम्यान नागपूरच्या शुभमने पोलिसांकडून मारहाण झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. मारहाण करणारे पोलीस नेमप्लेटशिवाय असल्याचा दावाही त्याने केला असून, दिल्ली पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनादरम्यान नागपूरच्या शुभमसोबत नेमकं काय घडलं? शुभमने दिल्ली पोलिसांवर मारहाणीचे गंभीर आरोप करत आंदोलनादरम्यान पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा केला आहे. मारहाण करणारे काही पोलीस कर्मचारी नेमप्लेटशिवाय असल्याचा आरोपही शुभमने केला आहे. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, आंदोलनकर्त्यांवर कारवाई करताना पोलिसांनी नियमांचं पालन केलं होतं का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शुभमच्या या गंभीर आरोपांवर दिल्ली पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे पोलिसांची बाजू समोर आल्यानंतरच या संपूर्ण प्रकरणातील नेमकं सत्य आणि घटनेची वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com