Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण मागे घेत आंदोलनाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. या निर्णयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्याचा अत्यंत आनंद असून राज्य सरकार त्यांच्या मागण्यांबाबत नेहमीच सकारात्मक राहिले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. जरांगे यांच्या प्रमुख १३ मागण्यांपैकी १२ मागण्या सरकारने आधीच मान्य केल्या असून उर्वरित मुद्द्यांवर कायदेशीर चौकटीत तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मराठा समाजाला जे काही हक्क आणि आरक्षण मिळाले आहे, ते आमच्या सरकारच्या काळातच मिळाले असून सर्व आश्वासनांची पूर्तता केली जाईल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.