Jayant Patil Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar पुरुन उरणार? | Sangli | Ishwarpur | Sakal News

Sangli Political News: 'सांगलीच्या राजकीय रणधुमाळीत जयंत पाटीलांचा कस लागणार? विरोधकांची एकजूट, फडणवीसांचा प्रचार आणि ईश्वरपूरच्या निवडणुकीत वाढलेलं तापमान!'

Jayant Patil: राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शरद पवारांचे निष्ठावंत, तसेच पक्ष संघटनेत हातखंडा असलेलं नाव. मागील चार दशकांपासून सांगली जिल्ह्यात सक्रीय राजकारण करत असलेल्या पाटीलांसाठी यंदाची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक विशेष महत्त्वाची ठरणार आहे. कारण या वेळी निवडणूक ही केवळ स्पर्धा नसून पाटील यांच्या राजकीय प्रभावाची कसोटी ठरणार आहे. त्यांचे जवळपास सर्व राजकीय विरोधक एकत्र आले असून, भाजपनेही या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात ताकद झोकून दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com