कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणात अत्यंत महत्त्वाचे केंद्र असलेल्या 'गोकुळ' दूध संघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शाहूवाडी येथील ठरावधारकांच्या एका विशेष मेळाव्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी अमर खोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब असुर्लेकर यांच्यात स्थानिक पातळीवरील राजकीय वर्चस्वावरून आणि विधानसभा निवडणुकीतील नाराजीवरून तीव्र शाब्दिक चकमक उडाली. महायुतीमधील घटक पक्षांचे नेते वरवर गोकुळच्या निवडणुकीसाठी एकत्र आल्याचे चित्र निर्माण करत असले, तरी ग्रामीण व तालुका पातळीवर जुने वाद आणि अस्वस्थता अद्याप कायम असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते. जागावाटपाचे सूत्र आणि उमेदवारी निश्चित झाल्यानंतरही स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील हा विसंवाद महायुतीच्या अडचणी वाढवणारा ठरू शकतो. कोल्हापूरच्या राजकारणातील या नव्या घडामोडींचा घेतलेला हा मागोवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.