कोपरगावच्या टाकळी शिवारात अंगणात खेळणाऱ्या 4 वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला, महामार्गावर ठिय्या | Sakal News

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात अंगणात खेळणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांचं नगर-मनमाड महामार्गावर ठिय्या आंदोलन, तर भाजपचे युवानेते विवेक कोल्हे यांनी वन अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले..

Kopargaon Leopard Attack: अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात अंगणात खेळणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या हल्ल्यात चिमुकलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी रात्री उशिरा नगर-मनमाड महामार्गावर ठिय्या आंदोलन करत रास्ता रोको केला. ग्रामस्थांचा आरोप आहे की, परिसरात बिबट्याचे दर्शन वारंवार होत असले तरी वनविभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com