व्हिडिओ | Videos
Nilesh Ghaiwalच्या गळ्याभोवतीचा फास आवळला, महिला व्यावसायिकलाही धमकावलं| Pune police | Sakal News
Nilesh Ghaiwal Case: कोथरूड गोळीबार प्रकरणात घायवळ गँगवर मकोका अंतर्गत कारवाई; महिला व्यावसायिकाकडून खंडणीचीही उघडकी..
Nilesh Ghaiwal Case: कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर पोलिसांनी निलेश घायवळ गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईनंतर घायवळ टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून निलेश घायवळवर आतापर्यंत तब्बल 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या 10 गुन्ह्यांपैकी 8 गुन्हे कोथरूड पोलीस ठाण्यात, तर प्रत्येकी एक गुन्हा वारजे आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यात नोंदवला गेला आहे.