Sindhudurg Rada: शुल्लक कारणावरून परप्रांतयांची स्थानिक तरुणांना मारहाण, काय घडलं? | Sakal Media | Sakal News

Sindhudurg News: शुल्लक कारणावरून परप्रांतीय युवकांनी स्थानिक तरुणांना मारहाण केल्याची घटना कुडाळ येथे घडली.

कुडाळ (सिंधुदुर्ग) तालुक्यातील पिंगुळी गुढीपूर येथे शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून परप्रांतीय तरुणांनी स्थानिक युवकांना बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. ही घटना मुंबई–गोवा महामार्गावर घडली. स्थानिक दोन तरुण आणि तीन परप्रांतीय तरुण यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. वाद वाढताच परप्रांतीय तरुणांनी स्थानिक युवकांना आपल्या खोलीत खेचून नेले आणि त्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये एका स्थानिक तरुणाच्या डोक्यात फावड्याने वार करण्यात आला असून तो गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. गंभीर जखमी झालेल्या युवकावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या हल्ल्यात सहभागी परप्रांतीय युवकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

nitesh rane statement mumbai goa highway
kudal midc infrastructure development news
Mumbai Goa Highway latest update 2026
wild elephant entering Maharashtra from Goa
Marathi News Esakal
www.esakal.com