उत्तर महाराष्ट्र आणि नाशकात ठाकरेंच्या पक्षाला खिळखिळा केल्यानंतर भाजपानं आपला मोर्चा धुळ्याकडे वळवला आहे. पण इथे भाजपानं ठाकरेंऐवजी थेट राष्ट्रीय स्तरावर भिडणाऱ्या आणि विरोधी पक्ष असणार्या काँग्रेसला लक्ष्य केलं. ते म्हणजे ७० वर्षांपासून काँग्रेसशी, विशेषत: गांधींशी एकनिष्ठ आणि अत्यंत निकटवर्तीय असणाऱ्या धुळ्यातील पाटील घराण्याला फोडण्यात भाजपला यश आलंय. खरंतर ज्या व्यक्तीनं लोकसभेत धुळ्यात पंजावर खासदार निवडून आणला, तेच कुणाल पाटील हे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे वर्षभरात असं काय घडलं की कुणाल पाटलांनी ७ दशकं ज्या विचारांवर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी राजकारण केलं, त्या काँग्रेसच्या विचारांना सोडून भाजपाची वाट धरली. त्यामुळे लोकसभेपर्यंत काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या कुणाल पाटलांना आता भाजपात जाण्याची गरज का वाटली असावी? मागील वर्षभरात पडद्याआ़ड असं काय घडलं, ते समजून घेऊयात या व्हिडिओतून-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.