आमदारासमोरच धारदार शास्त्राने हल्ला, तरुणाचा मृत्यू, लातूरात उडाली खळबळ | Latur News | Sakal News

Latur News: किरकोळ वादातून लातूरमध्ये थरारक हत्या! 21 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाला आमदार अमित देशमुखांनी स्वतः गाड्यांचा ताफा थांबवत रुग्णालयात पोहोचवले, उपचारादरम्यान मृत्यू; आरोपी पोलिसांच्या ताब्यात..

Latur News: लातूर शहराच्या पूर्व भागात किरकोळ वादातून २१ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, प्रचार सभा संपवून बाभळगावकडे जात असताना आमदार अमित देशमुख यांचा ताफा घटनास्थळाजवळून जात होता. रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला युवक दिसताच त्यांनी ताफा तात्काळ थांबवला आणि जखमी युवकाला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. मात्र डॉक्टरांनी उपचार सुरू असतानाच युवकाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com