भारताची लोकसभा सध्या ५४३ खासदारांची आहे... पण लवकरच ही संख्या ५४३ वरुन ८५० पर्यंत जाऊ शकते, अशी चर्चा आहे... वरकरणी हा निर्णय लोकशाही अधिक मजबूत करणारा वाटतोय. कारण लोकसंख्या वाढली, मतदार वाढले, त्यामुळे लोकसभेत खासदारांची संख्याही वाढायला हवी... हा यामागचा तर्क आहे. पण या जागावाढीमुळे देशाच्या राजकारणाचं संपूर्ण गणित बदलू शकतं, हे तुम्हाला माहितीये का? कारण लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांची पुनर्रचना झाली, तर उत्तर भारतातील राज्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. दुसरीकडे, लोकसंख्या नियंत्रणात ठेवणाऱ्या दक्षिण भारतातील राज्यांना मात्र प्रतिनिधित्वाच्या बाबतीत नुकसान होण्याची भीती आहे. आणि या सगळ्यात महाराष्ट्राचं नेमकं काय होणार? जागावाढीचा हा प्रस्ताव लोकप्रतिनिधित्व वाढवण्यासाठी आहे, महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आहे की त्यामागे काही राजकीय गणितही दडलंय?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.