Modi Government Protests: मोदी सरकारच्या १२ वर्षांत दिल्ली हादरवणारी ८ मोठी आंदोलनं; शेवट नेमका काय झाला?

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या काळात देशाच्या राजधानीत झालेली मोठी आंदोलनं, त्यांची कारणं आणि प्रत्येक आंदोलनाचा शेवट नेमका कसा झाला, जाणून घ्या.

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या काळात देशाची राजधानी दिल्ली अनेक मोठ्या आणि ऐतिहासिक आंदोलनांचा साक्षीदार राहिली आहे. कधी जवानांनी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं, तर कधी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील शाहीन बाग आंदोलनानेही देशाचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर देशातील आघाडीचे कुस्तीपटू महिला कुस्तीपटूंच्या न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले. आता NEET आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांविरोधात विद्यार्थी आणि तरुणांचा आवाज जंतर-मंतरवर घुमताना दिसत आहे. या आंदोलनांपैकी काही आंदोलनांनी केंद्र सरकारला निर्णय बदलण्यास किंवा मागण्या मान्य करण्यास भाग पाडलं, तर काही आंदोलनांमधील मागण्या आणि न्यायाचा लढा आजही सुरू आहे. मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या काळातील या महत्त्वाच्या आंदोलनांची पार्श्वभूमी काय होती, आंदोलनामागच्या प्रमुख मागण्या कोणत्या होत्या आणि प्रत्येक आंदोलनाचा शेवट नेमका कसा झाला, याचा सविस्तर आढावा या व्हिडीओमधून पाहूया...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com