'मुंबई बोलेगा खलिस्तान जिंदाबाद'; धमकीच्या मेलमध्ये खलिस्तानचा उल्लेख

खलिस्तान समर्थक घोषणा, १९८४ मधील शीख नरसंहार आणि खलिस्तान नॅशनल आर्मी व बब्बर खालसा या संघटनांची नावेही ई-मेलमध्ये नमूद करण्यात आली आहेत.

मुंबई महानगरपालिकेला पुन्हा एकदा धमकीचा ई-मेल आल्याने खळबळ उडाली आहे. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजून ११ मिनिटांनी महापौर कार्यालयात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी या ई-मेलमधून देण्यात आली आहे. तसेच मुंबईत पुढील ३० दिवस ग्रेनेड हल्ले करण्याची धमकीही देण्यात आली आहे. काही मेट्रो स्टेशनवर IED बॉम्ब ठेवल्याचा दावा ई-मेलमध्ये करण्यात आला आहे. २७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान मेट्रो स्टेशनवर बॉम्बस्फोट घडवण्याची धमकीही देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या ई-मेलमध्ये अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...