विनयभंगानंतर तरुणीला लोकलखाली ढकलल्याचा आरोप; नायगाव स्थानकातील धक्कादायक घटना|Naigaon | Mumbai news

लोकलमधून प्रवास करणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा भाईंदर ते नायगाव दरम्यान एका अनोळखी व्यक्तीने विनयभंग केल्याचा आरोप

मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मालाडहून विरारला जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा भाईंदर ते नायगाव दरम्यान एका अनोळखी व्यक्तीने विनयभंग केल्याचा आरोप आहे. नायगाव स्थानकात झालेल्या वादानंतर आरोपीने तरुणीला धक्का दिल्याने ती दोन डब्यांच्या मधून रुळावर पडली. या दुर्घटनेत तिचा डावा हात कोपरापासून कापला गेला. पोलिसांनी गुन्ह्यात योग्य कलमे लावली नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे. यानंतर मनसेने रेल्वे पोलिसांकडे पाठपुरावा करत योग्य कलमे वाढवण्याची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...