पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र विधानसभेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी सरकारच्या धोरणांविरोधात आक्रमक भूमिका घेतली, मात्र यावेळी त्यांनी थेट अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना एक दिवसासाठी निलंबित केलं. या निर्णयानंतर नाना पटोले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी सरकारवर ताशेरे ओढत स्पष्टपणे सांगितलं की, सत्य मांडल्यामुळे आमचं निलंबन केलं जातंय, पण आम्ही शेतकऱ्यांचा आवाज उठवतच राहू. या सर्व प्रकारामुळे अधिवेशनात वातावरण चांगलंच तापलं असून विरोधकांनीही सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.