Nashik News: डोळ्यादेखत तरुण मुलगा गमावला, आईवडिलाची Devendra Fadnavis कडे न्यायाची साद

brutal murder of a young man in Sinnar Parents Seek Justice: नाशिकच्या सिन्नरमध्ये तरुणाची टोळक्याकडून घरात घुसून हत्या, डोळ्यादेखत तरुण मुलगा गमावला, आई-वडिलांची Devendra Fadnavisना साद..

नाशिक ग्रामीणमधील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिन्नर तालुक्यात काल रात्री उशिरा एका तरुणाची घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली. प्रवीण कांडळकर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, टोळक्याने घराचे दरवाजे तोडून थेट घरात शिरत धारदार शस्त्रांनी प्रवीणवर हल्ला केला. हल्लेखोरांनी कोयता, कुऱ्हाड, तलवार आणि चॉपरसारख्या घातक शस्त्रांचा वापर करत प्रवीणवर जबर हल्ला केला. या हल्ल्यात प्रवीणचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, जुने वाद आणि पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड घडल्याचे समोर आले आहे. मयत प्रवीण कांडळकरने काही काळापूर्वीच वावी पोलीस ठाण्यात टोळक्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मयताच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळेच प्रवीणचा बळी गेला, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. या घटनेनंतर मयताच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर आक्रोश केला. न्याय मिळवण्यासाठी त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साद घातली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com