संसदेच्या पावसाळी अधिवेशनात NEET पेपरफुटी प्रकरण आणि जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कथित कारवाईचा मुद्दा चांगलाच तापला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेत आक्रमक भूमिका घेतली. संसद परिसरात काळे कपडे परिधान करून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी संसद मोर्चादरम्यान विद्यार्थिनींच्या कपड्यांबाबत पोलिसांच्या कारवाईवर गंभीर सवाल उपस्थित केले. काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर नियमांच्या चौकटीत चर्चा करण्यास तयार असल्याचं स्पष्ट केलं. लोकसभा आणि राज्यसभेतील गोंधळ, विरोधकांचा आक्रमक पवित्रा, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि नेत्यांच्या महत्त्वाच्या बाईट्ससह संपूर्ण राजकीय घडामोडींचा सविस्तर आढावा जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट नक्की पाहा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.