नेपाळमध्ये पूरस्थिती गंभीर; भारतीयांसाठी 24×7 हेल्पलाइन जारी, हे नंबर सेव्ह करा!

नेपाळमध्ये पूरस्थिती गंभीर झाली असून, तिथे अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने 24×7 कंट्रोल रूम सुरू केला आहे. मदतीसाठी भारतीय दूतावास आणि नेपाळमधील स्थानिक प्रशासनाचे हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत.

भारतीय नागरिक +91 11 2308 8718 किंवा +91 11 2308 8719 या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात. WhatsApp कॉल किंवा मेसेजसाठी +91 9968291988 हा क्रमांक उपलब्ध आहे. तसेच situationroom@mea.gov.in या ई-मेलवरही मदत मागता येईल. काठमांडूतील भारतीय दूतावासाचे आपत्कालीन क्रमांक +977 9851316807, +977 9709107500 आणि +977 9810326117 हेही उपलब्ध आहेत. हे क्रमांक WhatsAppवरही वापरता येतील. नेपाळमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनी हे सर्व हेल्पलाइन क्रमांक सेव्ह करून ठेवावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com