Nitin Gadkari Speech ; पुणे मेट्रोचा किस्सा सांगत गडकरी नेमकं काय काय म्हणाले?

एस. के. कुलकर्णींच्या सत्कारावेळी नागपूर व पुणे मेट्रो, विकासकामांच्या आठवणी सांगत गडकरींची ‘मतभिन्नता असली तरी मतभेद नकोत’ ही भूमिका अधोरेखित केली.

पुणे पत्रकार भवनात ज्येष्ठ प्राध्यापक आणि पत्रकार एस. के. कुलकर्णी यांच्या ९०व्या वर्षपूर्तीनिमित्त नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी नितीन गडकरी यांनी एस. के. कुलकर्णी यांच्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या कार्याचा गौरव केला. पत्रकारितेत सत्य बोलणं, विचारांशी प्रामाणिक राहणं आणि समाजापर्यंत आपले विचार पोहोचवणं महत्त्वाचं असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. पत्रकारितेतील वस्तुनिष्ठता, व्यावसायिक पत्रकारिता, विचारभिन्नता आणि राजकारणातील मूल्यांवरही त्यांनी भाष्य केलं. नागपूर मेट्रो, विमानतळ आणि विकासकामांच्या आठवणी सांगताना गडकरी यांनी टीकेची पर्वा न करता योग्य वाटणारी कामं करण्याची भूमिका स्पष्ट केली. “मतभिन्नता असली तरी मतभेद नकोत,” या माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचाही त्यांनी उल्लेख केला. समाजहिताचं काम करताना योग्य निर्णय घेण्याची गरज असल्याचंही गडकरी म्हणाले. नेमकं काय काय म्हणाले? बघा हा व्हिडीओ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com