Parenting Tips: मुलांना खरं बोलण्याची सवय कशी लावायची? हे १० उपाय करून तर पाहा...

शाळकरी मुलांपासून ते कॉलेज गोईंग मुलं असणाऱ्या पालकांची एक तक्रार कायम असते की मुलं खोटं बोलतात. अन् मग पालकही संशयाच्या नजरेनं मुलांकडे पाहू लागतात अन् इथेच ते चुकतात. मुलांमध्ये प्रामाणिकपणाला प्रोत्साहन देण्यासाठी काही वर्तन टाळा ज्यामुळे अनावधानाने भीती किंवा गोंधळ निर्माण होईल.

मुलं मोठी व्हायला लागली की पालकांची जबाबदारी आणखी वाढते. एकतर आताची आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहिली तर, मुलं सुरक्षित ठेवणं हे जसं चॅलेंजिंग झालंय तसंच हल्ली मुलांमध्ये निरागसता, प्रामाणिकपणा टिकवण्याचं मोठं आव्हान पालकांसमोर असतं. कारण, टेक्नॉलॉजी, मोबाईल फोन्समुळे मुलंच काय तर अगदी पालक म्हणून आपणही आपल्या मोबाईलमध्ये रमलेले असतो. मुलांपासून ते अगदी आजोबांपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. अशात प्रत्यक्षात इन पर्सनही लोकांचं समोरासमोर बोलणं कमी झालंय. त्यामुळे आता मुलं खरं बोलताहेत की खोटं बोलतात हे एक आव्हान. त्यात काही टीनएज मुलांच्या पालकांची तक्रार असते की मुलं खोटं बोलायला लागली आहेत. आता काय करावं? तर माझं म्हणणं आहे मुलांवर एखादी गोष्ट करण्याआधी आरशासमोर उभं राहून स्वत:च आत्मपरीक्षण करावं. बरं हे पालकांना, घरातील मोठ्यांना सगळ्यांना लागू होतं. त्यामुळे आता मूल खोटं बोलतंय अशी शंका आली तर काय करावं?

शाळकरी मुलांपासून ते कॉलेज गोईंग मुलं असणाऱ्या पालकांची एक तक्रार कायम असते की मुलं खोटं बोलतात. अन् मग पालकही संशयाच्या नजरेनं मुलांकडे पाहू लागतात अन् इथेच ते चुकतात. मुलांमध्ये प्रामाणिकपणाला प्रोत्साहन देण्यासाठी काही वर्तन टाळा ज्यामुळे अनावधानाने भीती किंवा गोंधळ निर्माण होईल.

१. मुलांवर विश्वास ठेवा

सर्वात आधी तर मुलांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्यात प्रामाणिकपणा आणण्यासाठी प्रयत्न करा. आणि त्याची सुरुवात स्वत: पासून करा. ज्यामुळे मुलं खोटं बोलण्याआधी दहावेळा विचार करतील.

२. मुलांसमोर खोटे बोलणे किंवा अतिशयोक्ती करणे टाळा

मुलांशी कधीच खोटं बोलू नका. कसंय मुलं पालकांना फॉलो करत असतात. त्यामुळे त्यांच्याशी खोटं बोलणं किंवा एखाद्या गोष्टीची अतिशयोक्ती करणं टाळा. जेणेकरुन मुलंही खोटं बोलणार नाहीत.

३. त्यांच्या प्रामाणिकपणावर Overreact होऊ नका (Stop overreacting to their honesty)

एखादं मूल प्रामाणिक असताना त्यांना त्वेषात, रागात किंवा त्यांच्या वर्तणुकीबद्दल overact होणं त्यांना भविष्यात मोकळेपणाने बोलण्यापासून परावृत्त करू शकते. त्यामुळे मुलांशी कायम संयमाने, शांततेत बोला आणि सपोर्टिव्ह राहा

४. मुलांना दिलेला शब्द पाळा (Do not break promises)

तुम्ही मुलांना एखादं प्रॉमिस केलं, शब्द दिलात तर तो पाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा. कारण, शब्द किंवा वचनं पाळण्यात अयशस्वी झाल्यास, मुलांचा तुमच्या शब्दावरील विश्वास कमी होऊ शकतो आणि तुमच्याशी प्रामाणिक राहण्याची शक्यता कमी होईल.

५. मुलांबद्दल त्यांच्या पाठी बोलू नका

जेव्हा मुलांना हे कळतं की, तुम्ही त्यांच्या पाठीमागे त्यांच्याबद्दल निगेटिव्ह बोलत आहात, तेव्हा सर्वात आधी तर ते दु:खी होतात अन् दुसरं म्हणजे मग त्यांना तुमच्याशी खरं बोलण्याची किंवा काहीही शेअर करण्याची इच्छा नसते. अन् मुलं पालकांशी कोणतीही गोष्टी शेअर करण्यात समाधानी (comfortable) नसतात.

६. मुलांबद्दल जजमेंटल राहू नका

म्हणजे काय तर, मुलांनी जर विश्वासानं तुमच्याशी काही वैयक्तिक गोष्टी, विचार शेअर केले तर त्यावरुन त्यांचं चारित्र्य, वर्तन यावर लगेच कमेंट करू नका. अन्यथा मुलं तुमच्यासोबत कुठल्याही शेअर करणार नाहीत कारण त्यांना तिथे insecure अन् वारंवार आपल्याला कुणीतरी जज करतंय असं वाटेल.

७. मुलांच्या प्रामाणिकपणाला दोष देऊ नका

घरात वा आपण कुठेही बाहेर, नातेवाईकांमध्ये असाल तरी, मुलामधला प्रामाणिकपणा कसा टिकेल यावरच लक्ष असू दे. अनवधानानं किंवा जाणीवपूर्वकरित्या मुलाला त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल दोषी ठरवू नका किंवा घरात तसं वातावरण होईल अशी परिस्थितीही आणू नका. अन्यथा मुलं तुमच्याशी खरं बोलायला धजावणार नाहीत

८. मुलांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका

मुलं जेव्हा काहीतरी महत्त्वाचे सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्या भावना, त्यांचं म्हणणं शांततेत ऐकून घ्या. त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका अन्यथा त्यांच्या विचारांचा आई-बाबांवर काही फरक पडत नाही असा समज त्यांचा होऊ शकतो अन् भविष्यात ते तुमच्याशी खरं बोलणं टाळतील

९. मुलांमधला प्रामाणिकपणा त्यांच्याविरुद्ध वापरू नका

जर तुमचं मूल प्रामाणिक असेल, खरं बोलत असेल तर त्याला त्यासाठी प्रोत्साहन द्या, मुलाच्या खरं बोलण्यानं कितीही अडचणी आल्या तरी त्याबद्दल दोषी ठरवू नका. अन्यथा मुलाला विश्वासघात झाल्यासारखे वाटेल अन् त्याचा पालक म्हणून तुमच्याशी प्रामाणिक राहण्याची शक्यता धूसर होईल.

१०. मुलांकडून अवास्तव अपेक्षा करू नका

हल्लीच्या कॉम्पिटिटिव्ह जगात मुलांना योग्य शिक्षण देण्यासोबतच त्यांना योग्य संस्कार देणं अत्यंत महत्वाचं आहे. तरी, मुलांकडून अवाजवी, अवास्तव अशा अपेक्षा ठेवू नका. कारण मुलांना तुमच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाही तरी, त्याचा निगेटिव्ह परिणाम त्यांच्यावर होईल. ते स्वत:ला त्याबाबत दोष देत राहतील अन् पुन्हा तुमच्याशी खरं बोलण्याआधी हजारवेळा विचार करतील की हे आई-बाबांशी शेअर करू वा नको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com