पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पुरुषाच्या मृतदेहाचे दोन पाय आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा सांगवी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत उलगडा केला आहे. अनिल खाडे यांची त्यांच्याच मित्राने हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. आरोपी विष्णू कुंभार याने हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे केल्याचे तपासात उघड झाले. घटनास्थळी आढळलेल्या पोत्यातील सिमकार्डच्या कव्हरमुळे पोलिसांना तपासाची महत्त्वाची दिशा मिळाली. या धाग्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचून त्याला अटक केली. आरोपीच्या घरात मृतदेहाचे उर्वरित अवयवही आढळले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास कसा करण्यात आला? पोलिसांनी अवघ्या १२ तासांत हत्याकांडाचा उलगडा कसा केला? वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिलेली माहिती जाणून घ्या या सविस्तर बातमीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.