Pune News: भर रस्त्यात PMPML चालक ST चालकाला भिडला | Pimpri Chinchwad, Sakal News

Pune News: पीएमपीएमएल चालकाची मुजोरी कॅमेऱ्यात कैद; भर रस्त्यात बस थांबवून एसटी चालक-वाहकाशी वाद, अँटोनी कॉन्ट्रॅक्टरच्या चालकाकडून अश्लाघ्य शिवीगाळ, संबंधित चालकावर कारवाई होणार का?

पीएमपीएमएल बस चालकाची मुजोरी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भर रस्त्यात पीएमपीएमएल बस थांबवत या चालकाने एसटी महामंडळाच्या चालक व वाहकाशी जोरदार वाद घातल्याची घटना समोर आली आहे. या वादादरम्यान संबंधित पीएमपीएमएल चालकाने एसटी चालकाला अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, शिवीगाळ करणारा हा पीएमपीएमएल चालक अँटोनी कॉन्ट्रॅक्टरकडे कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, या प्रकारामुळे सार्वजनिक वाहतूक कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेतली जाणार का? संबंधित पीएमपीएमएल चालकावर कारवाई होणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com