pradip purnekar : कुटुंबीयांचा ठिय्या, ३ महिला ताब्यात पुर्णेकर प्रकरणात काय काय घडलं?

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: राजकीय वादाचा संशय, एसआयटीकडून सखोल तपास सुरू

ठाण्यातील घोडबंदर रस्ता परिसरात ठाकरेसेनेचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांची भररस्त्यात गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक हत्येनंतर ठाण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा थेट आरोप केला आहे. दरम्यान, पोलीस तपासात पूर्णेकर यांच्या जवळच्याच एका संशयिताला अटक करण्यात आली असून तीन महिलांचे कनेक्शनही समोर आले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे पोलीस आयुक्तांनी तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली की यामागे काही कौटुंबिक किंवा आर्थिक वाद होता, या सर्व बाबींचा सखोल तपास एसआयटी करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com